बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०नमस्कार , आता नवरात्री चालू आहे. बऱ्याच जणांच्या घरी देवीचा घट बसवीला जातो आणि पंचमी किंवा सप्तमी ला आपापल्या पद्धती प्रमाणे देवीला कडाकणी आणि देवीचे दागिने अर्पण केले जाते नैवेध्य दाखविला जातो.तर इथे मी कडाकणी आणि दागिने कसे बनवायचे ते अगदी अचूक प्रमाण आणि सोप्या समजेल अशा पद्धतीने सांगितले आहे.

साहीत्य 

मैदा - १ वाटी 
बारीक रवा - १/२ वाटी 
दूध - १/२ वाटी 
पिठी साखर - ६ ते ७ चमचे 
वेलची पूड १/२ चमचा 
मीठ - चिमूटभर 
तूप - २ ते ३ चमचे 

कृती 

-सर्वात आधी दुधामध्ये पिठीसाखर विरघळून घ्यायची.
-एका परातीमध्ये पीठ घालून त्यामध्ये रवा, चिमूटभर मीठ, वेलची पूड घालून २ चमचे तूप गरम  करून घालावे.
-तूप पिठामध्ये व्यवस्तीत मिक्स करावे.
-पिठीसाखर घातलेले दूध पिठामध्ये थोडे थोडे घालत पीठ थोडे मऊ मळावे.
-मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
-आर्ध्या तासानंतर पीठ परत मळून त्याचे एका आकाराचे लहान लहान गोळे करून पातळ कडाकणी लाटाव्या.
- कडाकणी गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढावे.
-दागिने करत असाल तर वेणी, फणी, हात,बांगड्या, जोडव्या करून त्यादेखील सोनेरी रंगावर तळून काढावे.

टीप 

-साखरे ऐवजी दुधात पिठीसाखर घातल्याने पिठीसाखर लवकर विरघळते.
-पीठ मळताना थोडे मऊच मळावे. कारण पिठामध्ये आपण रवा  घातला आहे. जस जसे वेळ जाईल तस तसे रवा  पाणी शोषून घेते.
-कडाकणी लाटल्यावर त्यावर सुरीने किंवा काटे चमच्याने टोचे मारावेत. म्हणजे कडाकणी पुरी सारखे फुगणार नाही.
कडाकणी रेसिपी विडिओ बघण्यासाठी खाली बघा. 

Find us on YouTube

Popular Posts