सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या - Less oily wheat puri


श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी.

साहीत्य 

३ ते ४ जणांसाठी 

गव्हाचे पीठ - मोठ्या ३ वाट्या 

मीठ - चवीनुसार 

साखर - १ चमचा 

तेल 

कृती 

-एका परातीमध्ये पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, २ ते ३ चमचे तेल घालून थोडे थोडे पाणी घालत पीठ घट्ट मळावे.

-मळलेले पीठ १० मिनिटांसाठी झाकून ठेवावे.

-१० मिनिटांनंतर झाकण काढून हाताला तेल लावून परत थोडे पीठ मळावे.

-एका आकाराचे लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको मध्यम असाव्यात.

-पुऱ्या लाटतेवेळी ग्यास वर तेल गरम करण्यासाठी ठेवावे.

-तेल पूर्ण गरम झाल्यावरच पुरी तेलात सोडावी.

-पुऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

या गव्हाच्या पुऱ्या श्रीखंड (shrikhand), बटाट्याची भाजी (batatyachi bhaji ), कुर्मा (kurma ) सोबत खायला खूप छान लागतात.

कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या - Less oily wheat puri 

नोट 

-पिठामध्ये साखर घातल्याने पुरीला रंग छान येतो.

-पीठ मळून जास्त वेळ भिजण्यासाठी ठेऊ नये पीठ जर ज्यादा सईल झाले तर पुऱ्या तेलकट होतात.

-पुरीची पहिला एक बाजू व्यवस्तीत तळून पुरी पलटी करून दुसरी बाजू देखील तळून घ्यावे असे केल्याने पुऱ्या खूप तेलकट होत नाहीत.

-पुरी काढताना पुरीचे पूर्ण तेल निथळून मग पुरी काढावी.

कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या विडिओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=BRbnzEebUvE0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts