नमस्कार, आता नवरात्र सुरु आहे नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. त्याचबरोबर देवीला कणकेचे ९ आरत्या(दिवे), ९ फळे आणि ९ मुटके करून दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून देवीची आरती केली जाते आणि आरती झाल्यानंतर त्यातली वात काढून दिवे, फळ आणि मुटके प्रसाद म्हणून खाल्ले जातात. या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाची वात लावलेली असते त्यामुळे याची चव खूप छान लागते. तर हे कणकेचे दिवे, फळ आणि मुटके (kankeche dive, fal, & mutke) कसे बनवायचे ते आपण आता बघूया.
साहीत्य
गव्हाचे पीठ - १.१/२ वाट्या
मीठ - १/२ चमचा
तेल - ४ ते ५ चमचे
कृती
-परात मध्ये पीठ घालून पिठामध्ये मीठ आणि २ चमचे तेल घालून मिक्स करावे.
-थोडे थोडे पाणी घालत पीठ घट्ट मळून १० मिनिटे झाकून ठेवावे.
-१० मिनिटांनंतर झाकण काढून हाताला तेल लावून परत थोडे पीठ मळून लिंबा एवढे एका आकाराचे गोळे करावे.
दिवे
-एक गोळा घेऊन त्याला हातावर घेऊन अंगठा आणि हाताच्या सहाय्याने दिव्याचा आकार द्यावा. खाली ठेऊन दिव्याचा तळ सपाट करावे. अशाच प्रकारे ९ दिवे बनवावे.
फळ
-एक गोळा घेऊन दोन्ही हाताच्या साहाय्याने गोल थापी बनवावे. अशाच प्रकारे ९ फळे बनवावे.
मुटके
-एक लहान गोळा घेऊन तो हातावर वळावा आणि तो मुठीत पकडून त्याला बोटांचा छाप द्यावा. अशाच प्रकारे ९ मुटके बनवावे.
शिजवण्याची प्रोसेस
-इडलीच्या प्लेट ला तेल पुसून त्यामध्ये दिवे, फळ आणि मुटके ठेवावे.
-इडली कुकर मध्ये पाणी घालून पाणी उकळावे.
-पाणी उकळल्यावर त्यामध्ये सर्व प्लेट ठेवावे आणि वरून झाकण ठेऊन ग्यास ची फ्लेम मध्यम ठेऊन १० ते १५ मिनिट शीजु द्यावे.
-१५ मिनिटानंतर झाकण काढून कूकर मधून प्लेट काढून १० मिनिटे थंड होऊ द्यावे.
-दिवे, फळ आणि मुटके थंड झाल्यानंतर सर्व ताटामध्ये काढून दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून देवीची आरती करतात.
-आरती झाल्यानंतर दिव्यातली वात काढून दिवे, फळ आणि मुटके खाण्यासाठी तयार.
नोट
कणीक घट्ट मळावी. कणीक जर सैल झाली तर दिव्यांना व्यवस्तीत आकार देता येत नाही.
कणकेचे दिवे, फळ आणि मुटके याची पूर्ण रेसिपी खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=0-RvvDhT30k
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा