मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

दह्या पासून चक्का आणि चक्क्या पासून श्रीखंड - how to make shrikhand in marathi
चक्का बनविण्यासाठी साहीत्य 

दही - १.१/२ वाटी 

श्रीखंड बनविण्यासाठी साहीत्य 

चक्का - १ वाटी 

पीठी साखर - ४ चमचे 

जायफळ पूड - पाव चमचा 

वेलदोडे पूड - १/२ चमचा 

बदामाचे काप 

चक्का बनवण्याची कृती 

-एक खोलगट भांड घेऊन त्यावर एक गाळणी ठेऊन त्यामध्ये एक स्वच्छ सुती रुमाल किंवा कापड ठेऊन त्यामध्ये दही घालायचे.

-रुमालाचे सर्व बाजू एकत्र करून घट्ट दाबून दह्यातले सर्व पाणी काढावे.

-रुमालाची घट्ट गाठ बांधावी आणि बेसिनच्या वरती नळाला कींवा एका हुक्क ला साधारण ६ते ७ तास टांगून ठेवावे, म्हणजे दह्यातील सर्व पाणी गळून जाईल. 

-सर्व पाणी गळून गेल्यावर साधारण ६-७ तासांनी घट्टसर चक्का तयार होईल. 

-१.१/२ वाटी दह्या पासून १ वाटी चक्का तयार झाले.

श्रीखंड बनवण्याची कृती 

-बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल.

-गाळलेल्या चक्या मध्ये पिठीसाखर, जायफळ पूड, वेलदोडे पूड, बदामाचे काप घालून सर्व एकजीव करून २ मिनीट फेटावे.

-तयार श्रिखंड सर्व्हींग बाऊलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.

-थंडगार श्रीखंड पुरीबरोबर, चपाती बरोबर सर्व्ह करावे.

नोट 

-चक्का खूप आंबट असेल तर जेवढे चक्का असेल तेवढीच पिठीसाखर घ्यावे. चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.

-श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ टेस्पून दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.

-श्रीखंड बनवताना त्याचे Texture खुप महत्त्वाचे असते. जितके स्मूथ टेक्श्चर तितके ते चवीला छान लागते. त्यासाठी भरपूर फेटावे.

दह्या पासून चक्का आणि चक्क्या पासून श्रीखंड पूर्ण विडिओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=UkXWkalKX3Q

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts