दिवाळी, अधिक मास आला कि अनारसे बनवणे हे आलेच. बऱ्याच जणांचा असा समज आहे कि अनारसे बनवणे फार किचकट आहे आणि बऱ्याचदा अनारसे हवे तसे होत नाहीत . म्हणूनच या पोस्ट मध्ये टिप्स पण दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे अनारसे खुसखुशीत जाळीदार गाभा असलेले होतील.
साहीत्य
साधे तांदूळ - मोठ्या २ वाट्या
पिवळा गूळ खिसलेला - मोठ्या १.१/२ वाट्या (ज्या वाटीने तांदूळ घेतो त्याच वाटीने गूळ)
तूप - २ ते ३
चिमूटभर मीठ
कृती
-सर्वात आधी तांदूळ निवडून तांदूळ स्वच्छ धुवून घेणे.
-तांदळात पाणी घालून झाकून ३ दीवस तांदूळ भिजण्यासाठी ठेवावे.
-४ थ्या दीवशी तांदळातील सर्व पाणी काढून एका स्वच्छ सुती कापडावर पसरवून १ तास सुकवावे.
-१ तासा नंतर तांदूळ मिक्सर मधून बारीक दळून घ्यावे.
-दळलेले सर्व पीठ चालून घेणे.
-पीठामध्ये गूळ, चिमूटभर मीठ, १ ते २ चमचे तूप घालून मीक्स करावे.
-मीक्स केलेले मिश्रण मिक्सर मधून फिरवून घेणे म्हणजे सर्व एकजीव होईल.
-आता मिश्रणाचे गोळे करून एका हवा बंद डब्या मध्ये ३ दिवस पीठ मुरण्यासाठी ठेवावे.
-४ थ्या दिवशी जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढे पीठ घेऊन हाताला तूप लावून पीठ मळून घ्यावे.
-पेढ्याएवढा गोळा करून खसखशीवर थापून घ्यावे.
-कढईत तेल गरम करून खसखशीची बाजू वर करून अनारसा तेलात सोडावे आणि झाऱ्याने अनारस्यावर वरून तेल उडवावे मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्यावे.
नोट
-हे अनारसा पीठ ५ ते ६ महीने आरामात टिकते.
-जेवढे तांदूळ घेता त्याच्यापेक्षा कमी गुळ घ्यावे. गूळ जादा झाला तर अनारसा फसतो तो तेलात विरघळतो.
-अनारसा करायला घेता तेव्हा तुमचे पीठ खूप कोरडे वाटले तर २ ते ३ चमचे अजून गूळ घालून परत २ दिवस पीठ मुरण्यासाठी ठेऊन मग अनारसे करणे.
-अनारसा हा एकाच बाजूने तळावा पलटी करू नये.
-अनारसा तेलातून काढल्या काढल्या मऊ वाटतो पण जसजसे थंड होतील तसे ते खुसखुशीत कुरकुरीत होतात.
गुळाचे अनारसा व्हिडिओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=INIEfqrws8U
अनारसे पीठ हे पाच सहा महिने विना फ्रिजच राहतो का????
उत्तर द्याहटवा