गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

ब्रेड पीझ्झा रेसिपी मराठी मराठीमध्ये - bread pizza recipe in marathi

पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. लहान मुलांना आवडणारा ब्रेड पिझ्झा खूपच स्वादिष्ट होतो. मुलांच्या आवडीच्या भाज्या घालून दिवसभरात कोणत्याही वेळेला झटपट बनवून तयार होणारा साधा सोपा आणि चविस्ट पिझ्झा मुले खूप आवडीने खातात. लहान मुले तर पिझ्झा आवडीने खातातच त्याचबरोबर मोठे देखील पिझ्झा खूप आवडीने खातात.

आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल, मग चला तर आपण आज घरच्या घरी चटपटीत ब्रेड पिझ्झा (bread pizza) बनविण्याची रेसेपी जाणून घेऊ तोही तव्यावर.

साहीत्य 

ब्रेड - ४ ते ५

चीज - २०० ग्रॅम खिसुन 

शिमला मीरची - १ वाटी (बारीक चिरून )

स्वीट कॉर्न - १ वाटी 

कांदा - १ वाटी उभा चिरून 

टोमॅटो केचप - १ वाटी 

लोणी - ४ ते ५ चमचे 

ऑरिगेनो - १ चमचा 

चिली फ्लेक्स - १ चमचा 

काळी मीरी पावडर - १ चमचा  

चाट मसाला - १ चमचा 

संधैव मीठ - १ छोटी चम्मच या स्वादानुसार

कृती  How to make Bread Pizza

-ब्रेड स्लाइसला टोमॅटो केचप लावून घ्यावे.

-त्यावर चीज, सिमला मिरची, कांदा, स्वीट कॉर्न घालून परत वर थोडे चीज घालावे.

-त्यावर सर्व मसाले संधैव मीठ, चाट मसाला, काळी मीरी पावडर, ऑरिगेनो, चिली फ्लेक्स एक एक चिमूटभर घालावे.

-तवा गरम करून त्यावर लोणी पसरावे.

-आता तव्यावर ब्रेड ठेऊन झाकण ठेवून साधारण ५ ते ७ मिनिटे बेक करा किंवा चीज वितळून किंचित सोनेरी झाले, की लगेच पिझ्झा काढा.

-गरम गरम पिझ्झा खाण्यासाठी तयार.

-टोमॅटो केचप च्या ऐवजी पिझ्झा सॉस पण घालू शकता.

नोट 

-यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या उदा. स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, पनीर इ. घालून ब्रेड पिझ्झा बनवू शकता.

-चीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला.

ब्रेड पिझ्झा (bread pizza) रेसिपी चा विडिओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=uZHPGdKUEBs

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts