गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

तैसोळी रेसिपी मराठी मध्ये - Taisoli recipe in marathi


या रेसिपी मध्ये तुम्ही पाहू शकाल कर्नाटक स्पेशल(Breakfast Special Dish) गव्हाचे पीठ आणि काकडी (Cucumber Recipes)पासून तैसोळी. हि एक पौष्टिक रेसिपी आहे जी तुम्ही नाश्ता (Breakfast recipe ) किंवा जेवणासाठी (Lunch recipe) बनवू शकता. तैसोळी बनवणे फार सोपे आहे (easy cucumber recipes). लहान मोठे सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी रेसिपी आहे.

साहीत्य 

गव्हाचे पीठ - २ मोठ्या वाट्या 

काकडी - १ मोठी वाटी खिसुन 

मीठ - चवीनुसार 

जिरे पावडर १ चमचा 

हळद - पाव चमचा

हिरवी मिरची,कोथिंबीर पेस्ट -१ वाटी कोथिंबीर आणि २ ते ३ हिरव्या मिरच्या 

हींग - १ छोटा चमचा 

तेल 

कृती 

-एका पातेल्या मध्ये गव्हाचे पीठ, खिसलेली काकडी, चवीनुसार मीठ, हींग, जीरे पावडर, हळद, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट हे सर्व साहीत्य घालून मिश्रण एकजीव करावे.

-थोडे थोडे पाणी घालून मिश्रण दाटसर करावे. गुठळ्या होऊ देऊ नये. 

-तवा पूर्ण गरम झाल्यानंतर तव्याला तेल पुसावे.

-आमटीच्या पळीने कींवा वाटीने मिश्रण तव्यावर घालून पसरावे.

-वरून झाकण ठेऊन १ मिनिट वाफेवर शिजवावे.

१ मिनिटं नंतर झाकण काढून ३ ते ४ मिनिट तसेच भाजू द्यावे.

-४ मिनिटा नंतर तैसोळी पलटावी.

-दुसरी बाजू देखील २ मिनिट भाजावे. आणि प्लेट मध्ये काढावे.

हि तैसोळी (taisoli) तुपासोबत कींवा सॉस सोबत खायला खूप छान लागते. 

तैसोळी रेसिपी चा विडीओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=YoaBbKM27yA0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts