बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

Cook Simple Easy and Healthy Methichi Bhaji 

चवदार मेथीची भाजी - Methichi Bhaji recipe

साहित्य 

मेथी - १ जुडी ( नीट करून स्वच्छ धुवून)

मुगाची डाळ - ४ चमचे (१० ते १५ मिनिट गरम पाण्यात भिजवून घेणे)

कांदा - १ मोठा कांदा बारीक चिरून 

साखर -१/२ चमचा 

जीरे - १/२ चमचा 

हिरवी मिरची -१ (बारीक चिरून)

लसूण - १० ते १२ लसूण ची पेस्ट 

मीठ - चवीनुसार 

तेल - ३ ते ४ चमचे 

कृती 

-कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडायला लागल्या नंतर जीरे,मिरची आणि कांदा घालावे.

-कांदा थोडा परतावे आणि त्यामध्ये लसूण पेस्ट घालावे.

-कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतावे.

-कांदा आणि लसूण भाजल्यावर त्यामध्ये मुमूगाची डाळ घालून थोडे परतावे.

-मेथीची पाने घालून सर्व खालीवर करून एकजीव करून घ्यावे.

-ग्यास बारीक करून वरून झाकण ठेऊन ५ मिनिट वाफ द्यावी.

-५ ,मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये मीठ, साखर घालून परतावे. एकजीव करावे.

-परत १० मिनिट झाकण ठेऊन भाजी शिजवावी. 

ही झाली मेथीची भाजी Methichi Bhaji recipe तयार 

टीप 

भाजी करपेल असे वाटत असेल तर झाकण वर थोडे पाणी घालावे म्हणजे भाजी करपणार नाही.

चवदार मेथीची भाजी विडिओ खाली बघा 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts