गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

मसाले भात रेसिपी मराठी मध्ये - Masale bhat recipe in marathi


मसाले भात मराठी रेसिपी (masale bhat recipe in marathi) या रेसिपी मध्ये तुम्ही पाहू शकाल मसाले भात कुकर मध्ये कसा बनवायचा ते सांगितले आहे. सणवार किंवा काही तिखट खाण्याची इच्छा असेल तर मसाले भात एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण असे कि मसाले भात बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरात अगदी सहजतेने उपलब्ध असते.
आणि हा मसाले भात बनवण्यासाठी वेळ हि कमी लागतो. हा मसाले भात खूप स्वादिस्ट होतो.

how to make masale bhat in marathi

साहीत्य 

तांदूळ - १ ग्लास (स्वच्छ धुऊन पाणी नितळून) 
कच्चे शेंगदाणे - १/२ वाटी 
कच्चा बटाटा - १ लहान (फोडी करून) 
कांदा - १ मोठा (उभा चिरून) 
लाल तीखट - १ चमचा 
साखर - १ चमचा 
लिंबू रस - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
आलं,लसूण पेस्ट - १ चमचा (६ ते ७ लसूण पाकळ्या आणि १ इंच आलं) 
बिर्याणी मसाला - १ चमचा (बिर्याणी मसाला च्या ऐवजी गोडा मसाला देखील घेऊ शकता) 
तूप - ३ ते ४ चमचे 
मोहरी - १/२ चमचा 
जिरे - १/२ चमचा 
तमालपात्री - ३ ते ४ पाने 
दालचिनी - २ इंच  
वेलदोडे - २ 
लवंग - ४ ते ५ 
काळी मीरी - ५ ते ६ 
कडीपत्ता पाने - ५ ते ६ 
हळद - पाव चमचा 
काजू - आवडीनुसार (ऑपशनल) 
कोथिंबीर 
पाणी  - २ ग्लास 

 कृती 

-कुकर मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जीरे घालावे. 
-मोहरी,जीरे तडतडायला लागल्यावर कडीपत्ता पाने, तमालपात्री, दालचिनी, वेलदोडे, लवंग, काळी मीरी, घालून थोडे परतावे. 
-कांदा घालून ३ ए ४ मिनिटं परतावे त्यानंतर लसूण आलं पेस्ट घालून १ मिनिट परतावे. 
-आता यामध्ये शेंगदाणे,बटाटयाचे फोडी, काजू घालून १ मिनीटभर परतावे. आता हळद,लाल तिखट,बिर्याणी मसाला घालून थोडे परतायचे.
-त्यानंतर तांदूळ घालून १ मिनिट परतावे.
-आता पाणी घालावे. भात थोडं मऊ हवे असेल तर १ वाटी पाणी जास्त घालावे.
-मीठ, साखर, कोथिंबीर, आणि लिंबूचा रस घालून एकजीव करावे.
-कुकरचे झाकण लावून मध्यम ग्यासवर २ शिट्या काढाव्यात.
-२ शिट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यावे.
-कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण उघडावे.
-वरून तूप सोडून उलथन्याने किंवा पळीने भात मोकळा करून खालीवर करून एकजीव करावे.
हा झाला मसालेभात तयार. हा मसाले भात नुसताच खायला देखील छान लागतो.
मुलांना टिफिन मध्ये देखील तुम्ही हा मसाले भात(masale bhat recipe) देऊ शकता.

मसाले भात रेसिपीचा विडिओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=7eDBqsZopV40 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts