रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

गुणकारी आयुर्वेदीक काढा रेसिपी  - Curative Ayurvedic Kadha Recipe

भारतीय घरांमध्ये काढा हा शब्द काही नवीन नाही आणि सर्दी, खोकला घशाच्या खवखव कमी करण्यासाठी नेहमीच घरातील मोठी मंडळी काढा प्यायचा सल्ला देतात. काढा प्यायल्यानं वातावरणामुळे होणारे अनेक आजार बरे होतात आणि सोबतच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काढ्यामुळे घस्यातील खवखव कमी होते आणि सर्दी खोकल्यातही खूप आराम मिळतो. हा काढा खूप गुणकारी आहे. 

साहीत्य 

तुळशीची पाने - १२ ते १३

गवतीचहा 

लवंग - ५ ते ६

दालचिनी - ते ५ ते ६ लहान तुकडे 

आलं - १/२ इंच 

काळी मिरी - ५ ते ६

खडीसाखर - ३ ते ४ 

बडीशेप - १ चमचा 

पानी - ५ कप 

कृती 

-एका पातेल्यामध्ये ५ कप पाणी गरम करायला ठेवणे.

-दालचीनी,आलं,काळीमिरी,खडीसाखर,बडीशेप,लवंग हे सर्व जाडसर वाटून घेणे.

-वाटलेले मिश्रण गरम पाण्यामध्ये घालणे.

-तुळशीची पाने तोडून घालणे.

-गवतीचहा लहान लहान कट करून टाकणे.

-सर्व पाण्यामध्ये मीक्स करून वरून झाकण ठेऊन बारीक ग्यास करून १० ते १२ मिनिट शिजवणे.

-१० ते १२ मिनिटानंतर झाकण काढून ग्यास बंद करणे. हा झाला काढा तयार.

याची चव तर अप्रतिम होते. रात्री झोपायच्या आधी १ कप गरम गरम काढा प्यायचे आणि झोपायचे. 

लहान मुले देखील हा काढा आवडीने पितात. 

काढा प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, किटाणू आणि विषाणूंचा शरीरावरील परिणाम कमी होतो.वातावरण बदलामुळे होणारी सर्दी, खोकला, घशाची खवखव काढा प्यायल्यास दूर राहते.

काढा कसा बनवायचा याचा विडीओ खाली बघा

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts