गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

तैसोळी रेसिपी मराठी मध्ये - Taisoli recipe in marathi


या रेसिपी मध्ये तुम्ही पाहू शकाल कर्नाटक स्पेशल(Breakfast Special Dish) गव्हाचे पीठ आणि काकडी (Cucumber Recipes)पासून तैसोळी. हि एक पौष्टिक रेसिपी आहे जी तुम्ही नाश्ता (Breakfast recipe ) किंवा जेवणासाठी (Lunch recipe) बनवू शकता. तैसोळी बनवणे फार सोपे आहे (easy cucumber recipes). लहान मोठे सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी रेसिपी आहे.

साहीत्य 

गव्हाचे पीठ - २ मोठ्या वाट्या 

काकडी - १ मोठी वाटी खिसुन 

मीठ - चवीनुसार 

जिरे पावडर १ चमचा 

हळद - पाव चमचा

हिरवी मिरची,कोथिंबीर पेस्ट -१ वाटी कोथिंबीर आणि २ ते ३ हिरव्या मिरच्या 

हींग - १ छोटा चमचा 

तेल 

कृती 

-एका पातेल्या मध्ये गव्हाचे पीठ, खिसलेली काकडी, चवीनुसार मीठ, हींग, जीरे पावडर, हळद, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट हे सर्व साहीत्य घालून मिश्रण एकजीव करावे.

-थोडे थोडे पाणी घालून मिश्रण दाटसर करावे. गुठळ्या होऊ देऊ नये. 

-तवा पूर्ण गरम झाल्यानंतर तव्याला तेल पुसावे.

-आमटीच्या पळीने कींवा वाटीने मिश्रण तव्यावर घालून पसरावे.

-वरून झाकण ठेऊन १ मिनिट वाफेवर शिजवावे.

१ मिनिटं नंतर झाकण काढून ३ ते ४ मिनिट तसेच भाजू द्यावे.

-४ मिनिटा नंतर तैसोळी पलटावी.

-दुसरी बाजू देखील २ मिनिट भाजावे. आणि प्लेट मध्ये काढावे.

हि तैसोळी (taisoli) तुपासोबत कींवा सॉस सोबत खायला खूप छान लागते. 

तैसोळी रेसिपी चा विडीओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=YoaBbKM27yAमसाले भात रेसिपी मराठी मध्ये - Masale bhat recipe in marathi


मसाले भात मराठी रेसिपी (masale bhat recipe in marathi) या रेसिपी मध्ये तुम्ही पाहू शकाल मसाले भात कुकर मध्ये कसा बनवायचा ते सांगितले आहे. सणवार किंवा काही तिखट खाण्याची इच्छा असेल तर मसाले भात एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण असे कि मसाले भात बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरात अगदी सहजतेने उपलब्ध असते.
आणि हा मसाले भात बनवण्यासाठी वेळ हि कमी लागतो. हा मसाले भात खूप स्वादिस्ट होतो.

how to make masale bhat in marathi

साहीत्य 

तांदूळ - १ ग्लास (स्वच्छ धुऊन पाणी नितळून) 
कच्चे शेंगदाणे - १/२ वाटी 
कच्चा बटाटा - १ लहान (फोडी करून) 
कांदा - १ मोठा (उभा चिरून) 
लाल तीखट - १ चमचा 
साखर - १ चमचा 
लिंबू रस - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
आलं,लसूण पेस्ट - १ चमचा (६ ते ७ लसूण पाकळ्या आणि १ इंच आलं) 
बिर्याणी मसाला - १ चमचा (बिर्याणी मसाला च्या ऐवजी गोडा मसाला देखील घेऊ शकता) 
तूप - ३ ते ४ चमचे 
मोहरी - १/२ चमचा 
जिरे - १/२ चमचा 
तमालपात्री - ३ ते ४ पाने 
दालचिनी - २ इंच  
वेलदोडे - २ 
लवंग - ४ ते ५ 
काळी मीरी - ५ ते ६ 
कडीपत्ता पाने - ५ ते ६ 
हळद - पाव चमचा 
काजू - आवडीनुसार (ऑपशनल) 
कोथिंबीर 
पाणी  - २ ग्लास 

 कृती 

-कुकर मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जीरे घालावे. 
-मोहरी,जीरे तडतडायला लागल्यावर कडीपत्ता पाने, तमालपात्री, दालचिनी, वेलदोडे, लवंग, काळी मीरी, घालून थोडे परतावे. 
-कांदा घालून ३ ए ४ मिनिटं परतावे त्यानंतर लसूण आलं पेस्ट घालून १ मिनिट परतावे. 
-आता यामध्ये शेंगदाणे,बटाटयाचे फोडी, काजू घालून १ मिनीटभर परतावे. आता हळद,लाल तिखट,बिर्याणी मसाला घालून थोडे परतायचे.
-त्यानंतर तांदूळ घालून १ मिनिट परतावे.
-आता पाणी घालावे. भात थोडं मऊ हवे असेल तर १ वाटी पाणी जास्त घालावे.
-मीठ, साखर, कोथिंबीर, आणि लिंबूचा रस घालून एकजीव करावे.
-कुकरचे झाकण लावून मध्यम ग्यासवर २ शिट्या काढाव्यात.
-२ शिट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यावे.
-कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण उघडावे.
-वरून तूप सोडून उलथन्याने किंवा पळीने भात मोकळा करून खालीवर करून एकजीव करावे.
हा झाला मसालेभात तयार. हा मसाले भात नुसताच खायला देखील छान लागतो.
मुलांना टिफिन मध्ये देखील तुम्ही हा मसाले भात(masale bhat recipe) देऊ शकता.

मसाले भात रेसिपीचा विडिओ खाली बघा 

https://www.youtube.com/watch?v=7eDBqsZopV4रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

गुणकारी आयुर्वेदीक काढा रेसिपी  - Curative Ayurvedic Kadha Recipe

भारतीय घरांमध्ये काढा हा शब्द काही नवीन नाही आणि सर्दी, खोकला घशाच्या खवखव कमी करण्यासाठी नेहमीच घरातील मोठी मंडळी काढा प्यायचा सल्ला देतात. काढा प्यायल्यानं वातावरणामुळे होणारे अनेक आजार बरे होतात आणि सोबतच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काढ्यामुळे घस्यातील खवखव कमी होते आणि सर्दी खोकल्यातही खूप आराम मिळतो. हा काढा खूप गुणकारी आहे. 

साहीत्य 

तुळशीची पाने - १२ ते १३

गवतीचहा 

लवंग - ५ ते ६

दालचिनी - ते ५ ते ६ लहान तुकडे 

आलं - १/२ इंच 

काळी मिरी - ५ ते ६

खडीसाखर - ३ ते ४ 

बडीशेप - १ चमचा 

पानी - ५ कप 

कृती 

-एका पातेल्यामध्ये ५ कप पाणी गरम करायला ठेवणे.

-दालचीनी,आलं,काळीमिरी,खडीसाखर,बडीशेप,लवंग हे सर्व जाडसर वाटून घेणे.

-वाटलेले मिश्रण गरम पाण्यामध्ये घालणे.

-तुळशीची पाने तोडून घालणे.

-गवतीचहा लहान लहान कट करून टाकणे.

-सर्व पाण्यामध्ये मीक्स करून वरून झाकण ठेऊन बारीक ग्यास करून १० ते १२ मिनिट शिजवणे.

-१० ते १२ मिनिटानंतर झाकण काढून ग्यास बंद करणे. हा झाला काढा तयार.

याची चव तर अप्रतिम होते. रात्री झोपायच्या आधी १ कप गरम गरम काढा प्यायचे आणि झोपायचे. 

लहान मुले देखील हा काढा आवडीने पितात. 

काढा प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, किटाणू आणि विषाणूंचा शरीरावरील परिणाम कमी होतो.वातावरण बदलामुळे होणारी सर्दी, खोकला, घशाची खवखव काढा प्यायल्यास दूर राहते.

काढा कसा बनवायचा याचा विडीओ खाली बघा

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

Cook Simple Easy and Healthy Methichi Bhaji 

चवदार मेथीची भाजी - Methichi Bhaji recipe

साहित्य 

मेथी - १ जुडी ( नीट करून स्वच्छ धुवून)

मुगाची डाळ - ४ चमचे (१० ते १५ मिनिट गरम पाण्यात भिजवून घेणे)

कांदा - १ मोठा कांदा बारीक चिरून 

साखर -१/२ चमचा 

जीरे - १/२ चमचा 

हिरवी मिरची -१ (बारीक चिरून)

लसूण - १० ते १२ लसूण ची पेस्ट 

मीठ - चवीनुसार 

तेल - ३ ते ४ चमचे 

कृती 

-कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडायला लागल्या नंतर जीरे,मिरची आणि कांदा घालावे.

-कांदा थोडा परतावे आणि त्यामध्ये लसूण पेस्ट घालावे.

-कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतावे.

-कांदा आणि लसूण भाजल्यावर त्यामध्ये मुमूगाची डाळ घालून थोडे परतावे.

-मेथीची पाने घालून सर्व खालीवर करून एकजीव करून घ्यावे.

-ग्यास बारीक करून वरून झाकण ठेऊन ५ मिनिट वाफ द्यावी.

-५ ,मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये मीठ, साखर घालून परतावे. एकजीव करावे.

-परत १० मिनिट झाकण ठेऊन भाजी शिजवावी. 

ही झाली मेथीची भाजी Methichi Bhaji recipe तयार 

टीप 

भाजी करपेल असे वाटत असेल तर झाकण वर थोडे पाणी घालावे म्हणजे भाजी करपणार नाही.

चवदार मेथीची भाजी विडिओ खाली बघा 

ब्रेडचा उपमा रेसिपी -  bread upma recipe


ब्रेड उपमा - नाष्ट्यासाठी एक उत्तम पर्याय झटपट आणि टेस्टी रेसिपी

साहीत्य 

ब्रेड - १५ ते १६ ब्रेड (ब्रेड चे तुकडे करून घेणे)

कांदा - १ (बारीक चिरलेला)

भाजलेले शेंगदाणे - आवडीनुसार 

साखर - १ चमचा 

मोहरी - १/२ चमचा 

तेल - ३ ते ४ चमचा 

कढीपत्ता पाने - ६ ते ७ 

हळद - पाव चमचा 

लाल तिखट - १ चमचा (गरजेनुसार)

कोथिंबीर 

मीठ - चवीनुसार 

कृती 

How to make bread upma

-कढई मध्ये तेल गरम करून तेल तापल्या नंतर मोहरी घालावे.

-मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता पाने, कांदा, भाजलेले शेंगदाणे, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर घालून २ ते  ३ मिनिट परतावे, कांदा व्यवस्तीत भाजल्यावर त्यामध्ये ब्रेड चे तुकडे घालावे. 

-ग्यास ची फ्लेम बारीक करून कांद्याचे सर्व मिश्रण ब्रेडच्या तुकड्याना लागेल असे सर्व खालीवर करून एकजीव करून घ्यावे.

-वरून पाण्याचा एक हबका मारून (पाणी शिंपडून) वरून झाकण ठेऊन १ मिनिट वाफ द्यावी.

-१ मिनिटानंतर झाकण काढून थोडे परतावे आणि ग्यास बंद करावा.

हा झाला अगदी झटपट ब्रेड चा उपमा bread upma recipe  तयार. 

ब्रेडचा उपमा रेसिपी चा विडिओ खाली बघा.
Find us on YouTube

Popular Posts