सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

 

नारळी भात - Narali Bhat recipe in marathi

Narali Bhat recipe in marathi - या पोस्ट मध्ये नारळी भात कसा बनवायचा ते सांगितलं आहे. महाराष्ट्र मध्ये नारळी भात हा नारळी पुर्णीमेला करतात. हा raksha bandhan special narali bhat खूप छान होतो. याची चव तर अप्रतीम होते.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या(olya naralachya karanjya), नारळी भात, नारळी पाक( narali pak )असे पदार्थ बनविण्यात येतात. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

साहित्य

तांदूळ - १ वाटी

गुळ - १ वाटी (किसलेला)

ताजे खोवलेले खोबरे - १ वाटी

तूप - २ चमचे

लवंगा - ३ ते ४

दालचिनी - २ छोटे तुकडे

वेलदोडे - २

जायफळ (किसून) - पाव चमचा ला थोडा कमी.

काजू - ८ ते १०

वेलदोडे पावडर - १/२ चमचा

मीठ - चीमुटभर

गरम पाणी २ वाट्या

कृती

How to make Narali Bhat

-सर्वात पहिला तांदूळ स्वच्छ धुऊन तांदळातील पाणी पूर्ण नितळून घ्यावे.

-कुकर (narali bhat in pressure cooker) ग्यास वर ठेऊन त्यामध्ये तूप गरम क्ररावे.

-तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू तळून एका डीश मध्ये काढावे.

-आता त्याच तुपामध्ये दालचिनी,लवंगा,वेलदोडे घालून ३ ते ४ सेकंद परतावे.

-निथळलेले तांदूळ घालून परतून घ्यावे.

-परतलेल्या तांदळामध्ये २ वाटी पाणी घालावे आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून २ शिट्या काढाव्यात.

-कुकर थंड झाल्यानंतर भात खाली वर करून पूर्ण मोकळा करून घ्यावे.

-आता एक दुसरं पातेलं किंवा कढई गरम करून गूळ घालून गूळ विरघळवून घावे.

-गूळ विरघळल्या नंतर त्यामध्ये खोवलेले खोबरे घालून मीक्स करून घ्यावे.

-मोकळा केलेला भात घालून मीक्स करावे.

-काजू, वेलदोडे पावडर आणि जायफळ घालून परत मीक्स करावे.

-वरून झाकण ठेऊन बारीक ग्यासवर ५ ते १० मिनिट वाफवून घ्यावे.

हा झाला छान असा नारळीभात (coconut rice) तयार.

टिप्स

जर नारळी भात खूप गोड नको असेल तर गूळ १ वाटीच्या ऐवजी पाऊण वाटी घाला.

जर तुम्ही भात पातेल्यात शिजवत असाल तर १ वाटी तांदळाला २.१/२ ते ३ वाटी गरम पाणी घालावे.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटस घालू शकता.

नारळी भाताचा विडिओ खाली बघा 
नारळी पौर्णिमा

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.

नारळी पौर्णिमे दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात.

नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे.

पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात.

सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts