सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

  • ऑगस्ट १७, २०२०
  • Chetan Velhal
  • No comments

 Batata bhaji recipe in marathi- आज या पोस्ट मध्ये मी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सांगितली आहे. हि बटाट्याची भाजी चपाती, डोसा, आंबोळी सोबत खूप छान  लागते.

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच बटाट्या पासून वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ आहे. बटाटा ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोजम आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी बटाटा ही एक खाद्य वनस्पती आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती यूरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्‍चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाट्यात असलेल्या पोषक घटकांमुळे अनेक देशांत मानवी आहारामध्ये त्याचा समावेश केला जातो.

बटाट्यात ७५% पाणी आणि २०% स्टार्च हे दोन मुख्य घटक आहेत. यांशिवाय त्यात काही प्रथिने, कॅल्शियम, क जीवनसत्त्व आणि ब-समूह जीवनसत्त्वांपैकी निॲसीन असते. बटाटा हे लवकर पचणारे अन्न आहे. बटाटा उकडून किंवा तळून त्यापासून वेगवेगळे अन्नपदार्थ बनविले जातात. भारतात बटाट्यापासून तयार केलेले वडे, भाजी आणि वेफर मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात.

जर घरी पाहुणे अचानक आले तर नेहमी बटाट्याची भाजी लोक बनवतात. कारण Batata bhaji हि खूपच लवकर आणि स्वादिस्ट  होते.

साहित्य
बटाटे – बटाटे उकडून मध्यम आकाराच्या फोडी करून

कांदा – १ मोठा कांदा बारीक चिरून

आलं, लसूण पेस्ट – १/२ चमचा

हिरवी मिरची – १ बारीक चिरलेली

साखर – १ चमचा

हळद – पाव चमचा

कढीपत्ता

तेल

मोहरी

कोथिंबीर

कृती
-कढई मध्ये तेल घालून गरम करावे.

-तेल गरम झाल्यानंतर तेला मध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडल्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता ,चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट घालून परतावे.

-आता बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्तीत लालसर होईपर्यंत परतावे.

-कांदा व्यवस्तीत भाजल्यावर त्यामध्ये हळद घालून थोडे परतावे.

-आता त्यामध्ये बटाटयाच्या फोडी, चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर घालून सगळं एकत्र करून परतून घ्यावे.

-आता वर झाकण ठेऊन बारीक ग्यास करून २ मिनीट वाफेवर शिजू द्यावे.

-२ मिनिटानंतर ग्यास बंद करून भाजी परतावी. हि झाली Batata bhaji तयार.

हि Batata bhaji recipe चपाती, डोसा, आंबोळी सोबत खायला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

टिप्स

-जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर गरजे नुसार मिरची वापरावे.

Sonalis Marathi Recipe  या आमचा YOUTUBE चॅनेल ला अजून मस्स्त व्हिडीओ रेसिपी पाहण्यासाठी इथे जा 

कैरीचे झटपट लोणचे

लोणी स्पॉंज डोसा 

शिक्षणाचे कोर्स पाहण्यासाठी इथे वाचा

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा,subscribe करा आणि  इतरांना हि रेसिपी  shair करा. धन्यवाद 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts