सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

 

अळूच्या पानांचे गरगट रेसिपी - Aluchya pananche gargat recipe in marathi

Aluchya pananche gargat - या पोस्ट मध्ये अळूच्या पानांचे गरगट कसे बनवायचं ते सांगितलं आहे.

अळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते.

अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

अळूची पातळभाजी,अळूच्या पानांचे गरगट(Aluchya pananche gargat),आणी अळूवड्या हे  पदार्थ अळूच्या पानांपासून तयार केले जातात. खायला रुचकर आणि चविष्ट लागणारा अळूवडी (alu vadi) हा पदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

आळूच्या गरगट ला काही ठिकाणी Aluchya pananche fadfad ,Aluchya pananche fatfat, असेही म्हणतात. तर चला आता आपण बघूया अळूच्या पानाचे गरगट ची रेसिपी.

साहित्य

अळूची पाने मध्यम आकाराची  - १४ ते १५

कांदा - १ मोठा बारीक चिरलेला

शेंगदाणे - १/२ वाटी

हरभरा डाळ - १/२ वाटी

गुळ - १ चमचा

तिखट - १ चमचा (गरजेनुसार)

मीठ - चवीनुसार

चिंचेचा कोळ - २ चमचे

लसूण पेस्ट - ६ ते ७ पाकळ्यांचा लसूण पेस्ट

कोथिंबीर

मोहरी - १/२ चमचा

जिरे - १/२ चमचा

हळद - पाव चमचा

कृती

-सर्व प्रथम आळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी.

-आळूच्या देठाची बाजू कट करून आळूची पाणी बारीक बारीक चिरून घ्यावे.

-चिरलेली आळूची पाने कुकरच्या भांड्यात घालावे.

-अळूची कोवळी देठ पण बारीक बारीक चिरून घ्यावे आणि चिरलेल्या अळू मध्ये घालावे.

-चिरलेल्या अळू मध्ये हरभरा डाळ, शेंगदाणे, पाव चमचा चिंचेचा कोळ, आरदा चमचा तेल आणि अर्धा ग्लास पाणी घालावे.

-कुकर मध्ये तळाला थोडं (१/२ ते १ ग्लास )पाणी घालून कुकर मध्ये कूकरच भांड ठेऊन ४ शिट्या काढाव्यात.

-कूकर थंड झाल्यानंतर कूकर मधील भांड काढून सर्व मिश्रण घोटून घ्यावे.

-ग्यास वर कढई किंवा पातेल्यामध्ये तेल गरम करावे.

-तेल गरम झाल्यावर तेलामध्ये मोहरी घालावी.

-मोहरी तडतडल्यावर जिरे घालावे चिरलेला कांदा, लसूण पेस्ट घालून लालसर रंग येई पर्यंत परतावे.

-कांदा व्यवस्तीत भाजल्यावर अळूचे शिजलेले मिश्रण, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, १ चमचा चिंचेचा कोळ आणि गूळ घालून सर्व एकत्र करून १/२ ग्लास गरम पाणी घालून वरती झाकण ठेऊन १० मिनिट शिजवावे. १० मिनिट झाल्यावर वरून कोथिंबीर घालावी.

हे झाले अळूचे गरगट तयार. हे अळूचे गरगट चपाती, भाकरी, भात सोबत खूप छान लागते.

टीप

अळूचे गरगट करताना अळूची पाने हि हिरवीच घ्यावीत. पिवळसर घेऊ नये याने चव चांगली होणार नाही.गुळ, तिखट, चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

पाणी जास्त घालू नये. हि भाजी जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको. दाटसर झाली की चविस्ट होते.

अळूचे फायदे

-अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या होत नाही.

-अळूची पाने थंड असून ती वात, पित्त आणि कफनाशक असतात.

-अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होतात.

-तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

-अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

-बाळाला पाजताना दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने अळूची भाजी खावी.

-विषारी प्राणी चावल्यास अळूची पाने वाटून त्याचा चोथा करावा आणि तो लेप म्हणून त्या जागेवर लावावा. अशा व्यक्तीला अळूच्या पानांचा रस दिल्यास लगेच वेदना कमी होतात.

अळूच्या पानांचे गरगट रेसिपी विडिओ खाली बघा 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Find us on YouTube

Popular Posts