बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

Olya khobaryachi suki chatani

ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी  - Olya khobaryachi suki chatani

साहीत्य 

ओल्या खोबऱ्याचे काप - १ वाटी 

लसूण पाकळ्या - १५ ते २० 

लाल तिखट - १/२ चमचा (गरजेनुसार)

साखर - १ चमचा 

मीठ - चवीनुसार 

कृती 

-खोबऱ्याचे काप, लसूण पाकळ्या, लाल तिखट, साखर, मीठ हे सर्व मिक्सर मधून जाडसर वाटून घेणे 

-सर्व एकजीव करणे. हि झाली ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी तयार.

ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी चपाती भाकरी आंबोळी भात सोबत खूप छान लागते.

हि चटणी १० ते १२ दिवस रूम टेम्परेचर मध्ये आरामात टिकते.

ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी चा विडिओ खाली बघा.


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

उपवासाची बटाट्याची भाजी

 साहित्य 

बटाटे - २( उकडून बारीक फोडी करून)

साखर - १/२ चमचा 

मीठ - चवीनुसार 

हिरवी मिरची - गरजेनुसार 

जिरे - १/२ चमचा 

तेल - १ ते २ चमचे 

कृती 

-कढई मध्ये तेल गरम करावे.

-तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालायचे.

-जिरे तडतडायला लागल्यावर त्यामध्ये मिरची घालून परतावे.

-आता बटाट्याचे फोडी आणि चवीनुसार मीठ घालून १ मिनिट परतावे.

-वरून झाकण ठेऊन २ मिनिट बारीक ग्यास ठेऊन वाफेवर शिजवावे.

-२ मिनिटांनंतर ग्यास बंद करावा.

 बटाट्याची भाजी (Upvasachi batatyachi bhaji ) उपवासाच्या आंबोळी (upavasachi aamboli ) छान लागते. आणि नुसतीच खायला देखील खूप चॅन लागते.

it is very easy and quick to make. and it was delicious,Upvasachi batatyachi bhaji,fasting potato vegetable, 

उपवासाच्या बटाट्याची भाजीची रेसिपी चा विडिओ खाली बघा


upvasachi zatpat aamboli, aamboli of fasting


साहीत्य 

वरई तांदूळ - १ वाटी 

शाबूदाणे - ३ चमचे 

दही - ३ चमचे 

मीठ - चवीनुसार 

कृती 

शाबूदाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे.

वाटलेल्या शाबुदाण्यामध्येच वरई चे तांदूळ घालून हे देखील बारीक वाटून घ्यावे.

वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये किंवा पातेल्या मध्ये काढून त्यामध्ये दही घालून मिक्स करायचे.

मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालत मिश्रण दाटसर बनवायचे खुप घट्ट हि नको आणि खूप पातळ पण नको दाटसर करायचे.(तांदळाचे घावन बनवतो त्या प्रमाणे). 

या मध्ये चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्तीत मिक्स घरून घ्यायचे.

मिश्रण व्यवस्तीत सेट होण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवायचे.

अर्ध्या तासानंतर मिश्रण व्यवस्तीत फेटून घ्यावे. 

आता आंबोळी करायला घ्यावे त्यासाठी तवा पूर्ण तापल्यावर तव्याला तेल पुसून पळीने मिश्रण तव्यावर घालावे.

वरून झाकून २ मिनीट वाफेवर शिजवावे.

आता झाकण काढून आंबोळी पलटी करून दुसरी बाजु देखील भाजून घ्यावे.

अशाच सर्व आंबोळ्या कराव्यात.

नोट 

१ वाटी वरई पासून ६ ते ७ आंबोळ्या तयार होतात.

Aamboli of fasting It is very easy and simple recipe.

उपवासाची झटपट आंबोळी चा पूर्ण विडिओ खाली बघा.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

 mix daliche appe in marathi: 

मिश्र डाळींचे आप्पे - mix daliche appe in marathi


साहित्य

तांदूळ - ३ वाटी

हरभरा डाळ - १/२ वाटीला थोडं कमी

उडीद डाळ - १/२ वाटी

मुगडाळ - १/२ वाटी

मीठ - चवीनुसार

मिरची,आलं,कोथिंबीर ची पेस्ट - मिरची -१, आलं - १/२ इंच ,कोथिंबीर

खोबऱ्याच्या लहान चकत्या - ३ ते ४ चमचे

कृती

-सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुऊन ७-८ तास पाण्यात वेगवेगळ्या भिजवाव्यात.

-७-८ तासानंतर त्यातील पाणी काढून तांदुळ व डाळी मिक्सरमधून बारीक वाटून एकत्र मिक्स करून ८-९ तास आंबण्यासाठी ठेवाव्यात.

-७-९ तासानंतर वरील मिश्रणात आलं,मिरची,कोथिंबीर ची पेस्ट, मीठ, आणि खोबऱ्याचे चकत्या(काप) घालून सर्व मिक्स करून चांगले फेटावे.

-आप्पे पात्र गरम करावे व त्याला सगळीकडे तेल लावून घावे.

-पळीने सगळ्या कप्यात मिश्रण घालावे. वरून झाकण ठेऊन मंद ग्यासवर २-३ मिनिट वाफ काढावी.

-दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून चमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत.

हे झाले मिश्रंडाळीचे आप्पे तयार. हे आप्पे खोबऱ्याच्या चटणी (khobaryachi chatani )सोबत गरम गरम सर्व्ह करावेत .

नोट

पीठ जास्त पातळ करू नये.

मिश्र डाळींचे आप्पे चा विडिओ इथे बघा 


 

नारळी भात - Narali Bhat recipe in marathi

Narali Bhat recipe in marathi - या पोस्ट मध्ये नारळी भात कसा बनवायचा ते सांगितलं आहे. महाराष्ट्र मध्ये नारळी भात हा नारळी पुर्णीमेला करतात. हा raksha bandhan special narali bhat खूप छान होतो. याची चव तर अप्रतीम होते.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या(olya naralachya karanjya), नारळी भात, नारळी पाक( narali pak )असे पदार्थ बनविण्यात येतात. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

साहित्य

तांदूळ - १ वाटी

गुळ - १ वाटी (किसलेला)

ताजे खोवलेले खोबरे - १ वाटी

तूप - २ चमचे

लवंगा - ३ ते ४

दालचिनी - २ छोटे तुकडे

वेलदोडे - २

जायफळ (किसून) - पाव चमचा ला थोडा कमी.

काजू - ८ ते १०

वेलदोडे पावडर - १/२ चमचा

मीठ - चीमुटभर

गरम पाणी २ वाट्या

कृती

How to make Narali Bhat

-सर्वात पहिला तांदूळ स्वच्छ धुऊन तांदळातील पाणी पूर्ण नितळून घ्यावे.

-कुकर (narali bhat in pressure cooker) ग्यास वर ठेऊन त्यामध्ये तूप गरम क्ररावे.

-तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू तळून एका डीश मध्ये काढावे.

-आता त्याच तुपामध्ये दालचिनी,लवंगा,वेलदोडे घालून ३ ते ४ सेकंद परतावे.

-निथळलेले तांदूळ घालून परतून घ्यावे.

-परतलेल्या तांदळामध्ये २ वाटी पाणी घालावे आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून २ शिट्या काढाव्यात.

-कुकर थंड झाल्यानंतर भात खाली वर करून पूर्ण मोकळा करून घ्यावे.

-आता एक दुसरं पातेलं किंवा कढई गरम करून गूळ घालून गूळ विरघळवून घावे.

-गूळ विरघळल्या नंतर त्यामध्ये खोवलेले खोबरे घालून मीक्स करून घ्यावे.

-मोकळा केलेला भात घालून मीक्स करावे.

-काजू, वेलदोडे पावडर आणि जायफळ घालून परत मीक्स करावे.

-वरून झाकण ठेऊन बारीक ग्यासवर ५ ते १० मिनिट वाफवून घ्यावे.

हा झाला छान असा नारळीभात (coconut rice) तयार.

टिप्स

जर नारळी भात खूप गोड नको असेल तर गूळ १ वाटीच्या ऐवजी पाऊण वाटी घाला.

जर तुम्ही भात पातेल्यात शिजवत असाल तर १ वाटी तांदळाला २.१/२ ते ३ वाटी गरम पाणी घालावे.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटस घालू शकता.

नारळी भाताचा विडिओ खाली बघा 
नारळी पौर्णिमा

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.

नारळी पौर्णिमे दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात.

नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे.

पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात.

सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.

 

साखर आंबा तोतापुरी आंब्याचा - sakhar amba totapuri ambyacha

sakhar amba totapuri ambyacha: साखर आंबा नुसते नावं घेतलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटत. उन्हाळा संपत आला आणि एक चांगला मुसळधार पाऊस येऊन गेला की आपण सग़ळे लोणचे, साखर आंबा, गु़ळआंबा करायाला सुरवात करतो. हे वर्षभर आपल्याला पुरेल असे आपण करतो. साखर आंबा sakhar amba totapuri ambyacha हा करायला हि सोपा आहे आणि त्याची चव तर अप्रतिम. माझ्या आई म्हणजे माझ्या सासूबाई यांनी मला हि रेसिपी शिकवली आहे. माझ्या घरी सर्वानाच हा साखर आंबा  खूप आवडतो. सगळेच खूप आवडीने खातात. तुम्हीही नक्की करून बघा तुम्हाला हि नक्की आवडेल आणि तुम्ही परत परत कराल. मुलांना तर खूपच आवडतो.. चला तर बघूया तोतापुरी आंब्याचा साखर आंबा कसा बनवायचा....

साहित्य

तोतापुरी आंबा - १/२ किलो

साखर : १/२ किलो

वेलची पूड : १/२ चमचा

लवंग : २ (optional )

कृती

-तोतापुरी आंबे धुऊन चांगले पुसून कोरडी करावे. मग त्याचे वरचे साल काढून जाडसर खिसुन किंवा चिरून घ्यायचे.

-एका पातेल्यामध्ये खिसलेला आंबा आणि साखर मिक्स करून मध्यम ग्यासवर शिजायला ठेवायचा.

-मधून मधुन परतत् रहायचा आणि छान १ तारी पाक होई पर्यंत शिजवायचा.

-साखर आंब्याचा १ तारी पाक तयार झाल्यावर ग्यास बंद करून त्यामध्ये वेलची पूड आणि लवंग टाकून मिक्स करायचे. तुमच्या कडे केशर available असेल तर तुम्ही केशर पण घालू  शकता. हा झाला तोतापुरी आंब्याचा साखर आंबा तयार.

-साखर आंबा थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.

-हा साखर आंबा नुसता खायला हि छान लागतो आणि चपाती हि सोबत खूप छान लागतो.

-हा साखर आंबा sakhar amba totapuri ambyacha १ महिना बाहेर चांगला टिकतो आणि रेफ्रिजरेटर मध्ये ६ महिने चांगला टिकतो.

टीप

-तोतापुरी आंबा एकदम कच्चा पण नको आणि एकदम पिकलेला पण नको. मध्यम हवा.

-साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता

-साखर आंबा हा बनण्यासाठी १० मिनिट लागतात. थोडा कलर बदलायला लागल्यावर ग्यास बंद करायचा.

-व्यवस्तीत पाक तयार झाला आहे कि नाही समजण्यासाठी एका छोट्या डिश मध्ये साखरेच्या पाकचा एक थेंब घालायचे आणि थंड झाल्यावर बोटांच्या साहाय्याने बघायचे.

साखर आंबा चा विडिओ खाली बघा  

अळूच्या पानांचे गरगट रेसिपी - Aluchya pananche gargat recipe in marathi

Aluchya pananche gargat - या पोस्ट मध्ये अळूच्या पानांचे गरगट कसे बनवायचं ते सांगितलं आहे.

अळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते.

अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

अळूची पातळभाजी,अळूच्या पानांचे गरगट(Aluchya pananche gargat),आणी अळूवड्या हे  पदार्थ अळूच्या पानांपासून तयार केले जातात. खायला रुचकर आणि चविष्ट लागणारा अळूवडी (alu vadi) हा पदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

आळूच्या गरगट ला काही ठिकाणी Aluchya pananche fadfad ,Aluchya pananche fatfat, असेही म्हणतात. तर चला आता आपण बघूया अळूच्या पानाचे गरगट ची रेसिपी.

साहित्य

अळूची पाने मध्यम आकाराची  - १४ ते १५

कांदा - १ मोठा बारीक चिरलेला

शेंगदाणे - १/२ वाटी

हरभरा डाळ - १/२ वाटी

गुळ - १ चमचा

तिखट - १ चमचा (गरजेनुसार)

मीठ - चवीनुसार

चिंचेचा कोळ - २ चमचे

लसूण पेस्ट - ६ ते ७ पाकळ्यांचा लसूण पेस्ट

कोथिंबीर

मोहरी - १/२ चमचा

जिरे - १/२ चमचा

हळद - पाव चमचा

कृती

-सर्व प्रथम आळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी.

-आळूच्या देठाची बाजू कट करून आळूची पाणी बारीक बारीक चिरून घ्यावे.

-चिरलेली आळूची पाने कुकरच्या भांड्यात घालावे.

-अळूची कोवळी देठ पण बारीक बारीक चिरून घ्यावे आणि चिरलेल्या अळू मध्ये घालावे.

-चिरलेल्या अळू मध्ये हरभरा डाळ, शेंगदाणे, पाव चमचा चिंचेचा कोळ, आरदा चमचा तेल आणि अर्धा ग्लास पाणी घालावे.

-कुकर मध्ये तळाला थोडं (१/२ ते १ ग्लास )पाणी घालून कुकर मध्ये कूकरच भांड ठेऊन ४ शिट्या काढाव्यात.

-कूकर थंड झाल्यानंतर कूकर मधील भांड काढून सर्व मिश्रण घोटून घ्यावे.

-ग्यास वर कढई किंवा पातेल्यामध्ये तेल गरम करावे.

-तेल गरम झाल्यावर तेलामध्ये मोहरी घालावी.

-मोहरी तडतडल्यावर जिरे घालावे चिरलेला कांदा, लसूण पेस्ट घालून लालसर रंग येई पर्यंत परतावे.

-कांदा व्यवस्तीत भाजल्यावर अळूचे शिजलेले मिश्रण, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, १ चमचा चिंचेचा कोळ आणि गूळ घालून सर्व एकत्र करून १/२ ग्लास गरम पाणी घालून वरती झाकण ठेऊन १० मिनिट शिजवावे. १० मिनिट झाल्यावर वरून कोथिंबीर घालावी.

हे झाले अळूचे गरगट तयार. हे अळूचे गरगट चपाती, भाकरी, भात सोबत खूप छान लागते.

टीप

अळूचे गरगट करताना अळूची पाने हि हिरवीच घ्यावीत. पिवळसर घेऊ नये याने चव चांगली होणार नाही.गुळ, तिखट, चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

पाणी जास्त घालू नये. हि भाजी जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको. दाटसर झाली की चविस्ट होते.

अळूचे फायदे

-अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या होत नाही.

-अळूची पाने थंड असून ती वात, पित्त आणि कफनाशक असतात.

-अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होतात.

-तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

-अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

-बाळाला पाजताना दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने अळूची भाजी खावी.

-विषारी प्राणी चावल्यास अळूची पाने वाटून त्याचा चोथा करावा आणि तो लेप म्हणून त्या जागेवर लावावा. अशा व्यक्तीला अळूच्या पानांचा रस दिल्यास लगेच वेदना कमी होतात.

अळूच्या पानांचे गरगट रेसिपी विडिओ खाली बघा  

ताकाच्या कढीची इडली - Takachya kadhichi idali in marathi

Takachya kadhichi idali: या पोस्ट मध्ये ताकाच्या कढीची इडली कशी बनवायची ते सांगितलं आहे.

थंडीचे दिवस आले कि सर्दी,खोकला,शिंका,ताप यायला सुरुवात होते. आशा वेळी आपण नवीन नवीन प्रयोग करत राहतो. सर्दी,खोकल्या मुळे खूप त्रास होतो अशावेळी जर गरमागरम कढी पिली तर घशाला तर आराम मिळतोच पण सर्दी देखील लवकर कमी होते.

काढीमध्ये लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी कढी हा एक उत्तम पर्याय आहे.

पावसाळ्यात देखील कढी पिल्याने थकवा दूर होतो. त्वचा चांगली राहते कारण बेसनमुळे besan शरीरात कोलेजन बनते.

गर्भवती महिलांनी कढी kadhi खाणं उत्तम आहे. यात फोलिएट, जीवनसत्त्व ब-६ आणि लोह असतं. हे मुलांच्या वाढीस मदत करते आणि गर्भपात होण्याची शक्यताही कमी करते.

कढीतल्या इडल्या तर लहान मुलं खूप आवडीने खातात. त्यामुळे मी बऱ्याच वेळा कढीतल्या इडल्या बनवते.

साहित्य

कढी - ३ वाट्या

रवा - २ वाट्या

कृती

-कढी मध्ये रवा घालून मिक्स करावे.

-रवा थोडा थोडा घालत मिक्स करावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

-सर्व रवा कढीमध्ये मिक्स केल्यानंतर वरून झाकण ठेऊन ७-८ तास तसेच भिजत ठेवावे.

-८ तासानंतर झाकण काढून परत एकदा मिश्रण ढवळून घ्यावे.

-आता इडलीच्या कुकर मध्ये थोडे पाणी घालून पाणी उकळायला ठेवावे.

-पाणी उकळू पर्यंत इडली च्या प्लेटाना तेल पुसावे.

-कुकर मधील पाणी उकळ्या नंतर इडलीच्या प्लेट मध्ये इडली चे मिश्रण घालून कुकर मध्ये ठेवणे.

-वरून झाकण ठेऊन १५-२० मिनिट वाफेवर शिजवायचे.

-२० मिनिटा नंतर ग्यास बंद करून कुकर मधील सर्व प्लेटा काढून ५-१० मिनिट थंड होऊ द्यायचे.

-१० मिनिटा नंतर इडल्या काढायच्या.

या झाल्या ताकाच्या कढीच्या इडल्या Takachya kadhichi idali तयार.

या इडल्या (Takachya kadhichi idali) टोमॅटो सॉस(tomato sos), खोबऱ्याची चटणी(khobaryachi chatani ) सोबत खायला छान लागतात.

ताकाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी ताकामध्ये काळे मीठ मिसळून पिल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून टाकते. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

ताक पिल्याने स्मरण शक्ती वाढते.

ताक पिल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते.

उचकीचा त्रास होत असेल तर ताकात एक चमचा सुंठ पावडर मिसळून पीणे.

उलट्या किंवा मळमळ होत असेल तर ताक पिल्याने फायदा होतो.

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा.

ताकाच्या कढीची इडली रेसिपी चा विडीओ खाली बघा.
 

ताकाची कढी रेसिपी मराठी मध्ये - Takachi kadhi recipe in marathi

akachi kadhi recipe: या पोस्ट मध्ये ताकापासून कढी कशी बनवायची ते सांगितलं आहे.

तुम्हाला माहिती आहे का शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून टाकते. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

थंडीचे दिवस आले कि सर्दी,खोकला,शिंका,ताप यायला सुरुवात होते. आशा वेळी आपण नवीन नवीन प्रयोग करत राहतो. सर्दी,खोकल्या मुळे खूप त्रास होतो अशावेळी जर गरमागरम कढी पिली तर घशाला तर आराम मिळतोच पण सर्दी देखील लवकर कमी होते.

काढीमध्ये लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी कढी हा एक उत्तम पर्याय आहे.

पावसाळ्यात देखील कढी पिल्याने थकवा दूर होतो. त्वचा चांगली राहते कारण बेसनमुळे besan शरीरात कोलेजन बनते.

गर्भवती महिलांनी कढी kadhi खाणं उत्तम आहे. यात फोलिएट, जीवनसत्त्व ब-६ आणि लोह असतं. हे मुलांच्या वाढीस मदत करते आणि गर्भपात होण्याची शक्यताही कमी करते.

ताकामध्ये व्हिटॅमिन B 12 , कॅलशियम , पोटॅशियम , फॉस्फरस सारखे तत्व असतात.

साहित्य (INGREDIENTS)

ताक – ४ ग्लास

ज्वारी पीठ – ३ चमचे

बेसन पीठ – २ चमचे

साखर – ३ चमचे (गरजेनुसार)

आलं लसूण पेस्ट – ६ ते ७ लसूण पाकळ्या आणि १/२ इंच आलं याची पेस्ट

तेल – ३ चमचे

दालचीने तुकडे – २

लवंग – ३ ते ४

मीठ – चवीनुसार

मोहरी

कढीपत्ता

बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती (INSTRUCTIONS)

-ताकामध्ये बेसन पीठ घालून गुठळ्या होऊ न देता व्यवस्तीत मिक्स करावे.

-आता ताकामध्ये ज्वारी पीठ देखील घालून गुठळ्या होऊ न देता व्यवस्तीत मिक्स करावे.

-आलं लसूण पेस्ट ,साखर, हळद , चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून बारीक ग्यास वर ठेवावे.

-आता छोट्या कढई मध्ये तेल गरम करायला ठेवावे.

-तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मोहरी घालायची.

-मोहरी  तडतडल्या नंतर कडीपत्ता घालून ग्यास बंद करावे.

-आता ही फोडणी थोडी थंड झाल्या नंतर ताकाच्या मिश्रणा मध्ये घालावे.

-बारीक ग्यास वरच ही कढी १० मिनिट शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये ढवळत रहायचे.

-१० मिनिटानंतर वरून कोथिंबीर घालून ग्यास बंद करायचा. हि झाली ताकाची कढी (Takachi kadhi recipe) तयार.

नोट :

बारीक ते मध्यम आचेवरच कढी (Takachi kadhi recipe) शिजू द्यावी. मोठ्या आगीवर कढी ला लगेच उकळी येऊन कढी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ताक वेगळे आणि मसाला वेगळा असे होऊ शकते. म्हणून कढी (kadhi )बारीक आगीवरच शिजू द्यावी आणि सतत ढवळत राहावी.

ताकाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी ताकामध्ये काळे मीठ मिसळून पिल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून टाकते. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

ताक पिल्याने स्मरण शक्ती वाढते.

ताक पिल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते.

उचकीचा त्रास होत असेल तर ताकात एक चमचा सुंठ पावडर मिसळून पीणे.

उलट्या किंवा मळमळ होत असेल तर ताक पिल्याने फायदा होतो.

गवारीची भाजी रेसिपी इथे पहा

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा.

ताकाची कढी रेसिपी विडीओ खाली बघा 

  • ऑगस्ट १७, २०२०
  • Chetan Velhal
  • No comments

 olya khobaryachi chatani in marathi : या पोस्ट मध्ये ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते सांगितलं आहे. हि चटणी कमी साहित्यामध्ये आणि लवकर होते. खाण्यासाठी तर खूपच स्वादिस्ट लागते.


हि olya khobaryachi chatani चटणी डोसा (dosa), लोणी स्पॉंज डोसा (loni sponge) डोसा,उत्तपा( uttapa) ,उपमा (upma) .इडली (idali), आंबोळी (aamboli ),उडीद वडा (udid vada ), भज्जी (bhajji ),आप्पे (aappe ) सोबत खायला छान लागते.


साहित्य

ओले खोबरे – १ वाटी लहान लहान तुकडे करून


हिरवी मिरची – २ ते ३ (गरजेनुसार)


मीठ – चवीनुसार


साखर – २ ते ३ चमचे


कडीपत्ता


मोहरी


तेल


कृती

-मिक्सरच्या भांड्यामधे ओले खोबरे घालावे.


-त्यामध्येच मिरची,साखर, मीठ आणि थोडे पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.


-वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये किंवा लहान पातेल्यामध्ये काढून घ्यावे.


-वाटलेले मिश्रण खूप पातळ हि नको आणि खूप घट्ट हि नको. दाटसर असावे.


-आता मिश्रण मध्ये फोडणी घालायची आहे त्यासाठी एका लहान कढई मध्ये तेल गरम करावे.


-तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालावे.


-मोहरी तडतडल्या नंतर कडीपत्ता घालून ग्यास बंद करायचा.


-आता हि फोडणी खोबऱ्याच्या मिश्रण मध्ये घालून सर्व मिक्स करावे. हि झाली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार.


हि olya khobaryachi chatani चटणी डोसा (dosa), लोणी स्पॉंज डोसा (loni sponge) डोसा,उत्तपा( uttapa) ,उपमा (upma) .इडली (idali), आंबोळी (aamboli ),उडीद वडा (udid vada ), भज्जी (bhajji ),आप्पे (aappe ) सोबत खायला छान लागते. ओल्या खोबऱ्याची चटणीलाच  naralachi chatani,Coconut Chutney म्हणतात


फायदे

खोबऱ्या मध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असितात. त्यामुळे खोबरे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत. म्हणूनच olya khobaryachi chatani ही खाण्यासाठी चविस्ट असण्या सोबतच हि आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिज तत्व, साखरेतील घटक, कार्बोहायड्रेड्स असतात. हे शरीरातील फॅट कमी करतात. खोबऱ्यामध्ये अनेक औषिधी तत्व असतात. लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते अशावेळी मुलांच्या आहारामध्ये खोबऱ्याच्या चटणीचा समावेश करण खूप फायदेशीर ठरत.

खोबऱ्याची चटणी हि वजन कमी करण्यासाठी ही फायदेशीर ठरते.

खोबऱ्याची चटणी खाल्याने रक्त आणि आयर्न ची कमतरता दूर होते.

अनिमिया सारख्या आजारावर खोबऱ्याची चटणी हि अत्यंत फायदेशीर आहे.

नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची करवंटी हे सारं सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचं आहे.

  • ऑगस्ट १७, २०२०
  • Chetan Velhal
  • No comments

 Batata bhaji recipe in marathi- आज या पोस्ट मध्ये मी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सांगितली आहे. हि बटाट्याची भाजी चपाती, डोसा, आंबोळी सोबत खूप छान  लागते.

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच बटाट्या पासून वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ आहे. बटाटा ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोजम आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी बटाटा ही एक खाद्य वनस्पती आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती यूरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्‍चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाट्यात असलेल्या पोषक घटकांमुळे अनेक देशांत मानवी आहारामध्ये त्याचा समावेश केला जातो.

बटाट्यात ७५% पाणी आणि २०% स्टार्च हे दोन मुख्य घटक आहेत. यांशिवाय त्यात काही प्रथिने, कॅल्शियम, क जीवनसत्त्व आणि ब-समूह जीवनसत्त्वांपैकी निॲसीन असते. बटाटा हे लवकर पचणारे अन्न आहे. बटाटा उकडून किंवा तळून त्यापासून वेगवेगळे अन्नपदार्थ बनविले जातात. भारतात बटाट्यापासून तयार केलेले वडे, भाजी आणि वेफर मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात.

जर घरी पाहुणे अचानक आले तर नेहमी बटाट्याची भाजी लोक बनवतात. कारण Batata bhaji हि खूपच लवकर आणि स्वादिस्ट  होते.

साहित्य
बटाटे – बटाटे उकडून मध्यम आकाराच्या फोडी करून

कांदा – १ मोठा कांदा बारीक चिरून

आलं, लसूण पेस्ट – १/२ चमचा

हिरवी मिरची – १ बारीक चिरलेली

साखर – १ चमचा

हळद – पाव चमचा

कढीपत्ता

तेल

मोहरी

कोथिंबीर

कृती
-कढई मध्ये तेल घालून गरम करावे.

-तेल गरम झाल्यानंतर तेला मध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडल्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता ,चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट घालून परतावे.

-आता बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्तीत लालसर होईपर्यंत परतावे.

-कांदा व्यवस्तीत भाजल्यावर त्यामध्ये हळद घालून थोडे परतावे.

-आता त्यामध्ये बटाटयाच्या फोडी, चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर घालून सगळं एकत्र करून परतून घ्यावे.

-आता वर झाकण ठेऊन बारीक ग्यास करून २ मिनीट वाफेवर शिजू द्यावे.

-२ मिनिटानंतर ग्यास बंद करून भाजी परतावी. हि झाली Batata bhaji तयार.

हि Batata bhaji recipe चपाती, डोसा, आंबोळी सोबत खायला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

टिप्स

-जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर गरजे नुसार मिरची वापरावे.

Sonalis Marathi Recipe  या आमचा YOUTUBE चॅनेल ला अजून मस्स्त व्हिडीओ रेसिपी पाहण्यासाठी इथे जा 

कैरीचे झटपट लोणचे

लोणी स्पॉंज डोसा 

शिक्षणाचे कोर्स पाहण्यासाठी इथे वाचा

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा,subscribe करा आणि  इतरांना हि रेसिपी  shair करा. धन्यवाद 

 gavarichi bhaji recipe in marathi : या पोस्ट मध्ये झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने gavarichi bhaji कशी बनवायची हे सांगितलं आहे.


गवारी एक औषधी वनस्पती आहे. या भाजी मध्ये प्रोटीन,विरघळणारे फायबर,कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन K,C,A भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याबरोबरच यामध्ये फॉस्फरस,कॅलशीयम,लोह तत्व, आणि पोटॅशियम आढळून येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा फॅट आढळून येत नाही. त्यामुळे हि भाजी  आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.


काही ठिकाणी गवारीलाच बावची ची भाजी(bavachi bhaji) असेही म्हणतात. बावची ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोरॅलिया कॉरिलिफोलिया आहे. ती मूळची भारतातील आहे. चला तर बघूया गवारीची भाजी रेसिपी मराठी मध्ये(gavarichi bhaji recipe in marathi)


साहित्य

गवारी – पावशेर

कांदा – १ मोठा चिरलेला

लसूण – ३-४ पाकळ्या पेस्ट

शेंगदाणा कूट – १/२ वाटी

लाल तिखट – १/२ चमचा (आवडी नुसार)

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर

गोडा मसाला – १/२ चमचा

गुळ – खडा

आमसोल – १

जिरे – १/२ चमचा

मोहरी – १/२ चमचा

तेल -३-४ चमचे


कृती

-सर्व प्रथम गवारी मोडून (नीट करून) स्वछ धुवून पाणी निथळून घ्यायचे.

-एका कढई मध्ये तेल गरम करून तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घालायचे.

-आता गवारी घालायचे ५ मिनिट गवारी भरून घ्यावे.

-आता त्यामध्ये लाल तिखट,मीठ,गोडा मसाला,गूळ,आमसोल आणि शेंगदाणा कूट घालून परतावे.

-आता त्यामध्ये १ ग्लास गरम पाणी घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिट बारीक गॅस वर भाजी शिजवून घ्यावे.

-१०-१५ मिनिटाने भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून चपाती किंवा भाकरी सोबत भाजी सर्व्ह करावे.


टीप – हि भाजी कूकर मध्ये पण करू शकता


गवारीचे भाजी चे फायदे (gavar bhaji benefits)

डायबिटीज रुग्णांसाठी लाभदायक – गवारीमध्ये आढळून येणारे ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात.

भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात.

हृदयासाठी फायदेशीर – गवारीची अर्धीकच्ची भाजी आरोग्यासाठी सहायक मानली जाते.

दमा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर गवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो.

गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसर्या दिवशी या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.

कच्ची गवार बारीक करून यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.


चटकदार कैरीचे पळू

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा,subscribe करा आणि  इतरांना हि रेसिपी  shair करा. धन्यवाद 

  • ऑगस्ट १७, २०२०
  • Chetan Velhal
  • No comments

 kairiche zatpat lonche recipe

kairiche zatpat lonche recipe: कैरी चे लोणचे सर्वांनाच खूप आवडते. कैरीचे नाव जरी घेतले तर लगेच तोंडाला पाणी सुटते. या पोस्ट मध्ये अगदी झटपट आणि कमी साहित्या मध्ये आणि सोप्या पद्धतीने तोतापुरी कैरी चे झटपट लोणचे (totapuri kairi che lonche ) कसे करायचे ते सांगितलं आहे. हे लोणचे १ ते २ दिवस बाहेर छान टिकते. आणि फ्रिज मध्ये ८ ते १० दिवस छान टिकते.


कैरी अनेकांना आवडते .जेवणा सोबत कैरी खाण्याची एक वेगळी च मजा असते. कैरी फक्त खायलाच चांगली लागत नाही तर तिचे फायदे सुद्धा आहेत. पिंपल्स, उष्माघात, अपचना चि समस्या ह्या साठी कैरी हे एक उपयोगी फळ आहे. कैरीत व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट परिपूर्ण प्रमानात असते.ह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.कच्च्या कैरी मधील आंस्ट्रिंजंट गुणधर्म त्वचे वर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही.


साहित्य

तोतापुरी कैरी – १


साखर – १ चमचा


मीठ – चवीनुसार


लाल तिखट – १/२ चमचा (आवडी नुसार)


तेल – २ चमचे


मोहरी – १/२ चमचा


कडीपत्ता – ४ ते ५ पान


कृती

-सर्वात आधी कैरी स्वछ धुवुन पुसून घ्यावे.


-त्याचे लहान फोडी करून घ्यावे (बारीक/मोठी हव्या त्या आकारा मध्ये )


-कैरीच्या फोडी एका बाउल किंवा पाटल्या मध्ये घ्यावे.


-त्यामध्ये साखर,मीठ,लाल तिखट घालून एकत्र करावे.


-आता तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालावी.


-मोहरी तडतडल्या नंतर कडीपत्ता घालावा.


-मोहरी कडीपत्त्याची फोडणी थंड झाल्यावर कैरी च्या मिश्रणा मध्ये घालावे.


-आता सर्व मिक्स करून १० मिनिट झाकून ठेवावे.


-१० मिनिटा नंतर लोणच्याला रस सुटेल. हे झाले लोणचे खाण्यासाठी तयार.


टीप

वरून  फोडणी  नाही घातली तरी  लागते. हे लोणचे छान

हे लोणचे १ ते २ दिवस फ्रिज च्या बाहेर छान टिकते. आणि फ्रिज मध्ये ८ ते १० दिवस छान टिकते.


चटकदार कैरीचे पळू


ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आणि  पेज ला like करा,subscribe करा आणि  इतरांना हि रेसिपी  shair करा. धन्यवाद 

 


भरलेल्या वांग्याची भाजी रेसिपीbharlelya vangyachi bhaji recipe

bharlelya vangyachi bhaji recipe: या पोस्ट मध्ये भरली वांगी भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते सांगितले आहे.

वांग्या मध्ये अनेक फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषक तत्वे असतात. असे असून देखील त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगी हि सरस ठरतात. वांगी खाणे हे हाडांसाठीही फायदेशीर असतात. कारण यात आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. त्यासोबतच वांग्या मध्ये असलेले फिनॉलिक एसिड हाडांची झीज कमी करून हाडे बळकट करतात.

वांग्याची भाजी हि सर्वानाच आवडते पण जर वांगी हि भरून केली तर खूपच छान लागतात. चला तर मग बघूया bharlelya vangyachi bhaji recipe.

साहित्य

लहान आकाराची वांगी – पावशेर

कांदा – मोठा १ बारीक चिरलेला

टोमॅटो – १

आलं लसूण पेस्ट – १ चमचा

गोडा मसाला – १/२ चमचा

शेंगदाणा कूट – १ वाटी

तिखट – १ चमचा (आवडीनुसार )

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर

गुळ – १ चमचा

जिरे – १/२ चमचा

मोहरी – १/२ चमचा

तेल

वांग्याचे सारण कृती

एका प्लेट मध्ये किंवा बाउल मध्ये शेंगदाणा कूट, मीठ, तिखट, गोडा मसाला,थोडा कांदा,थोडा टोमॅटो घालून सर्व मिक्स करावे.

भरलेल्या वांग्याची भाजी कृती

-सर्व प्रथम वांगी धुवून घ्यावे.

-वांग्याचे देठ काढून मधून वांगी चिरून ४ भाग करावेत. पूर्ण चिरू नये. वांगी चिरून पाण्या मध्ये टाकावे म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत.

-सगळी वांगी चिरून झाल्या नंतर ग्यास वर कुकर ठेऊन त्यामध्ये तेल गरम करावे.

-तेल गरम झाल्या नंतर त्यामध्ये मोहरी घालावे.

-मोहरी तडतडल्या नंतर त्यामध्ये जिरे घालावे.

-आता थोडा कांदा घालून परतावे. कांदा लालसर भाजावे.

-कांदा भाजल्या नंतर त्यामध्ये थोडा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट घालून २ मिनिट त्याचा कच्छेपणा जाईपर्यंत भाजून घ्यावे.

-आता वांग्यांमध्ये सारण भरून सर्व वांगी आलगदपणे कढई मध्ये ठेवावे. आणि खाली वर परतावे.

-त्यामध्ये गूळ,थोडी कोथिंबीर घालावी आणि एक वाटी पाणी घालून वरून कुकर चे झाकण लावून १ शिटी काढावी.

-कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून भाजी व्यवस्तीत अलगद खालीवर करावे.

हि bharlelya vangyachi bhaji recipe चपाती, भाकरी,भात सोबत छान लागते.


टीप

भरली वांगी करण्यासाठी कोवळी आणि लहान आकाराची वांगी घ्यावे.

जर तुम्हाला रस जास्त हवा असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे.

जर तुमच्याकडे वेळ असेल तर कढई मध्ये हि वांगी करू शकता. सगळी प्रोसेस सेम आहे फक्त भाजीमध्ये गरम पाणी एक ग्लास घालून वरून झाकण ठेऊन १० ते १५ मिनिट शिजवून घ्यावे.

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून काळवा, आणि  पेज ला like करा,subscribe करा आणि  इतरांना हि रेसिपी  shair करा. धन्यवाद 

Find us on YouTube

Popular Posts