बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०
नोव्हेंबर २५, २०२०
Sonali Velhal
गोड पदार्थ
No comments
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
ऑक्टोबर १७, २०२०
Sonali Velhal
नवरात्र स्पेशल
No comments
नमस्कार, आता नवरात्र सुरु आहे नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. त्याचबरोबर देवीला कणकेचे ९ आरत्या(दिवे), ९ फळे आणि ९ मुटके करून दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून देवीची आरती केली जाते आणि आरती झाल्यानंतर त्यातली वात काढून दिवे, फळ आणि मुटके प्रसाद म्हणून खाल्ले जातात. या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाची वात लावलेली असते त्यामुळे याची चव खूप छान लागते. तर हे कणकेचे दिवे, फळ आणि मुटके (kankeche dive, fal, & mutke) कसे बनवायचे ते आपण आता बघूया.
साहीत्य
गव्हाचे पीठ - १.१/२ वाट्या
मीठ - १/२ चमचा
तेल - ४ ते ५ चमचे
कृती
-परात मध्ये पीठ घालून पिठामध्ये मीठ आणि २ चमचे तेल घालून मिक्स करावे.
-थोडे थोडे पाणी घालत पीठ घट्ट मळून १० मिनिटे झाकून ठेवावे.
-१० मिनिटांनंतर झाकण काढून हाताला तेल लावून परत थोडे पीठ मळून लिंबा एवढे एका आकाराचे गोळे करावे.
दिवे
-एक गोळा घेऊन त्याला हातावर घेऊन अंगठा आणि हाताच्या सहाय्याने दिव्याचा आकार द्यावा. खाली ठेऊन दिव्याचा तळ सपाट करावे. अशाच प्रकारे ९ दिवे बनवावे.
फळ
-एक गोळा घेऊन दोन्ही हाताच्या साहाय्याने गोल थापी बनवावे. अशाच प्रकारे ९ फळे बनवावे.
मुटके
-एक लहान गोळा घेऊन तो हातावर वळावा आणि तो मुठीत पकडून त्याला बोटांचा छाप द्यावा. अशाच प्रकारे ९ मुटके बनवावे.
शिजवण्याची प्रोसेस
-इडलीच्या प्लेट ला तेल पुसून त्यामध्ये दिवे, फळ आणि मुटके ठेवावे.
-इडली कुकर मध्ये पाणी घालून पाणी उकळावे.
-पाणी उकळल्यावर त्यामध्ये सर्व प्लेट ठेवावे आणि वरून झाकण ठेऊन ग्यास ची फ्लेम मध्यम ठेऊन १० ते १५ मिनिट शीजु द्यावे.
-१५ मिनिटानंतर झाकण काढून कूकर मधून प्लेट काढून १० मिनिटे थंड होऊ द्यावे.
-दिवे, फळ आणि मुटके थंड झाल्यानंतर सर्व ताटामध्ये काढून दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून देवीची आरती करतात.
-आरती झाल्यानंतर दिव्यातली वात काढून दिवे, फळ आणि मुटके खाण्यासाठी तयार.
नोट
कणीक घट्ट मळावी. कणीक जर सैल झाली तर दिव्यांना व्यवस्तीत आकार देता येत नाही.
कणकेचे दिवे, फळ आणि मुटके याची पूर्ण रेसिपी खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=0-RvvDhT30k
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
ऑक्टोबर १५, २०२०
Sonali Velhal
नाष्ट्याचे पदार्थ
No comments
पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. लहान मुलांना आवडणारा ब्रेड पिझ्झा खूपच स्वादिष्ट होतो. मुलांच्या आवडीच्या भाज्या घालून दिवसभरात कोणत्याही वेळेला झटपट बनवून तयार होणारा साधा सोपा आणि चविस्ट पिझ्झा मुले खूप आवडीने खातात. लहान मुले तर पिझ्झा आवडीने खातातच त्याचबरोबर मोठे देखील पिझ्झा खूप आवडीने खातात.
आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल, मग चला तर आपण आज घरच्या घरी चटपटीत ब्रेड पिझ्झा (bread pizza) बनविण्याची रेसेपी जाणून घेऊ तोही तव्यावर.
साहीत्य
ब्रेड - ४ ते ५
चीज - २०० ग्रॅम खिसुन
शिमला मीरची - १ वाटी (बारीक चिरून )
स्वीट कॉर्न - १ वाटी
कांदा - १ वाटी उभा चिरून
टोमॅटो केचप - १ वाटी
लोणी - ४ ते ५ चमचे
ऑरिगेनो - १ चमचा
चिली फ्लेक्स - १ चमचा
काळी मीरी पावडर - १ चमचा
चाट मसाला - १ चमचा
संधैव मीठ - १ छोटी चम्मच या स्वादानुसार
कृती How to make Bread Pizza
-ब्रेड स्लाइसला टोमॅटो केचप लावून घ्यावे.
-त्यावर चीज, सिमला मिरची, कांदा, स्वीट कॉर्न घालून परत वर थोडे चीज घालावे.
-त्यावर सर्व मसाले संधैव मीठ, चाट मसाला, काळी मीरी पावडर, ऑरिगेनो, चिली फ्लेक्स एक एक चिमूटभर घालावे.
-तवा गरम करून त्यावर लोणी पसरावे.
-आता तव्यावर ब्रेड ठेऊन झाकण ठेवून साधारण ५ ते ७ मिनिटे बेक करा किंवा चीज वितळून किंचित सोनेरी झाले, की लगेच पिझ्झा काढा.
-गरम गरम पिझ्झा खाण्यासाठी तयार.
-टोमॅटो केचप च्या ऐवजी पिझ्झा सॉस पण घालू शकता.
नोट
-यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या उदा. स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, पनीर इ. घालून ब्रेड पिझ्झा बनवू शकता.
-चीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला.
ब्रेड पिझ्झा (bread pizza) रेसिपी चा विडिओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=uZHPGdKUEBs
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
ऑक्टोबर १२, २०२०
Sonali Velhal
पुरी चे प्रकार
No comments
श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी.
साहीत्य
३ ते ४ जणांसाठी
गव्हाचे पीठ - मोठ्या ३ वाट्या
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमचा
तेल
कृती
-एका परातीमध्ये पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, २ ते ३ चमचे तेल घालून थोडे थोडे पाणी घालत पीठ घट्ट मळावे.
-मळलेले पीठ १० मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
-१० मिनिटांनंतर झाकण काढून हाताला तेल लावून परत थोडे पीठ मळावे.
-एका आकाराचे लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको मध्यम असाव्यात.
-पुऱ्या लाटतेवेळी ग्यास वर तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
-तेल पूर्ण गरम झाल्यावरच पुरी तेलात सोडावी.
-पुऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
या गव्हाच्या पुऱ्या श्रीखंड (shrikhand), बटाट्याची भाजी (batatyachi bhaji ), कुर्मा (kurma ) सोबत खायला खूप छान लागतात.
कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या - Less oily wheat puri
नोट
-पिठामध्ये साखर घातल्याने पुरीला रंग छान येतो.
-पीठ मळून जास्त वेळ भिजण्यासाठी ठेऊ नये पीठ जर ज्यादा सईल झाले तर पुऱ्या तेलकट होतात.
-पुरीची पहिला एक बाजू व्यवस्तीत तळून पुरी पलटी करून दुसरी बाजू देखील तळून घ्यावे असे केल्याने पुऱ्या खूप तेलकट होत नाहीत.
-पुरी काढताना पुरीचे पूर्ण तेल निथळून मग पुरी काढावी.
कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या विडिओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=BRbnzEebUvE
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
ऑक्टोबर ०६, २०२०
Sonali Velhal
गोड पदार्थ
No comments
चक्का बनविण्यासाठी साहीत्य
दही - १.१/२ वाटी
श्रीखंड बनविण्यासाठी साहीत्य
चक्का - १ वाटी
पीठी साखर - ४ चमचे
जायफळ पूड - पाव चमचा
वेलदोडे पूड - १/२ चमचा
बदामाचे काप
चक्का बनवण्याची कृती
-एक खोलगट भांड घेऊन त्यावर एक गाळणी ठेऊन त्यामध्ये एक स्वच्छ सुती रुमाल किंवा कापड ठेऊन त्यामध्ये दही घालायचे.
-रुमालाचे सर्व बाजू एकत्र करून घट्ट दाबून दह्यातले सर्व पाणी काढावे.
-रुमालाची घट्ट गाठ बांधावी आणि बेसिनच्या वरती नळाला कींवा एका हुक्क ला साधारण ६ते ७ तास टांगून ठेवावे, म्हणजे दह्यातील सर्व पाणी गळून जाईल.
-सर्व पाणी गळून गेल्यावर साधारण ६-७ तासांनी घट्टसर चक्का तयार होईल.
-१.१/२ वाटी दह्या पासून १ वाटी चक्का तयार झाले.
श्रीखंड बनवण्याची कृती
-बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल.
-गाळलेल्या चक्या मध्ये पिठीसाखर, जायफळ पूड, वेलदोडे पूड, बदामाचे काप घालून सर्व एकजीव करून २ मिनीट फेटावे.
-तयार श्रिखंड सर्व्हींग बाऊलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
-थंडगार श्रीखंड पुरीबरोबर, चपाती बरोबर सर्व्ह करावे.
नोट
-चक्का खूप आंबट असेल तर जेवढे चक्का असेल तेवढीच पिठीसाखर घ्यावे. चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.
-श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ टेस्पून दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.
-श्रीखंड बनवताना त्याचे Texture खुप महत्त्वाचे असते. जितके स्मूथ टेक्श्चर तितके ते चवीला छान लागते. त्यासाठी भरपूर फेटावे.
दह्या पासून चक्का आणि चक्क्या पासून श्रीखंड पूर्ण विडिओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=UkXWkalKX3Q
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०
ऑक्टोबर ०१, २०२०
Sonali Velhal
गोड पदार्थ
1 comment
दिवाळी, अधिक मास आला कि अनारसे बनवणे हे आलेच. बऱ्याच जणांचा असा समज आहे कि अनारसे बनवणे फार किचकट आहे आणि बऱ्याचदा अनारसे हवे तसे होत नाहीत . म्हणूनच या पोस्ट मध्ये टिप्स पण दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे अनारसे खुसखुशीत जाळीदार गाभा असलेले होतील.
साहीत्य
साधे तांदूळ - मोठ्या २ वाट्या
पिवळा गूळ खिसलेला - मोठ्या १.१/२ वाट्या (ज्या वाटीने तांदूळ घेतो त्याच वाटीने गूळ)
तूप - २ ते ३
चिमूटभर मीठ
कृती
-सर्वात आधी तांदूळ निवडून तांदूळ स्वच्छ धुवून घेणे.
-तांदळात पाणी घालून झाकून ३ दीवस तांदूळ भिजण्यासाठी ठेवावे.
-४ थ्या दीवशी तांदळातील सर्व पाणी काढून एका स्वच्छ सुती कापडावर पसरवून १ तास सुकवावे.
-१ तासा नंतर तांदूळ मिक्सर मधून बारीक दळून घ्यावे.
-दळलेले सर्व पीठ चालून घेणे.
-पीठामध्ये गूळ, चिमूटभर मीठ, १ ते २ चमचे तूप घालून मीक्स करावे.
-मीक्स केलेले मिश्रण मिक्सर मधून फिरवून घेणे म्हणजे सर्व एकजीव होईल.
-आता मिश्रणाचे गोळे करून एका हवा बंद डब्या मध्ये ३ दिवस पीठ मुरण्यासाठी ठेवावे.
-४ थ्या दिवशी जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढे पीठ घेऊन हाताला तूप लावून पीठ मळून घ्यावे.
-पेढ्याएवढा गोळा करून खसखशीवर थापून घ्यावे.
-कढईत तेल गरम करून खसखशीची बाजू वर करून अनारसा तेलात सोडावे आणि झाऱ्याने अनारस्यावर वरून तेल उडवावे मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्यावे.
नोट
-हे अनारसा पीठ ५ ते ६ महीने आरामात टिकते.
-जेवढे तांदूळ घेता त्याच्यापेक्षा कमी गुळ घ्यावे. गूळ जादा झाला तर अनारसा फसतो तो तेलात विरघळतो.
-अनारसा करायला घेता तेव्हा तुमचे पीठ खूप कोरडे वाटले तर २ ते ३ चमचे अजून गूळ घालून परत २ दिवस पीठ मुरण्यासाठी ठेऊन मग अनारसे करणे.
-अनारसा हा एकाच बाजूने तळावा पलटी करू नये.
-अनारसा तेलातून काढल्या काढल्या मऊ वाटतो पण जसजसे थंड होतील तसे ते खुसखुशीत कुरकुरीत होतात.
गुळाचे अनारसा व्हिडिओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=INIEfqrws8U
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
सप्टेंबर १७, २०२०
Sonali Velhal
नाष्ट्याचे पदार्थ
No comments
या रेसिपी मध्ये तुम्ही पाहू शकाल कर्नाटक स्पेशल(Breakfast Special Dish) गव्हाचे पीठ आणि काकडी (Cucumber Recipes)पासून तैसोळी. हि एक पौष्टिक रेसिपी आहे जी तुम्ही नाश्ता (Breakfast recipe ) किंवा जेवणासाठी (Lunch recipe) बनवू शकता. तैसोळी बनवणे फार सोपे आहे (easy cucumber recipes). लहान मोठे सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी रेसिपी आहे.
साहीत्य
गव्हाचे पीठ - २ मोठ्या वाट्या
काकडी - १ मोठी वाटी खिसुन
मीठ - चवीनुसार
जिरे पावडर १ चमचा
हळद - पाव चमचा
हिरवी मिरची,कोथिंबीर पेस्ट -१ वाटी कोथिंबीर आणि २ ते ३ हिरव्या मिरच्या
हींग - १ छोटा चमचा
तेल
कृती
-एका पातेल्या मध्ये गव्हाचे पीठ, खिसलेली काकडी, चवीनुसार मीठ, हींग, जीरे पावडर, हळद, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट हे सर्व साहीत्य घालून मिश्रण एकजीव करावे.
-थोडे थोडे पाणी घालून मिश्रण दाटसर करावे. गुठळ्या होऊ देऊ नये.
-तवा पूर्ण गरम झाल्यानंतर तव्याला तेल पुसावे.
-आमटीच्या पळीने कींवा वाटीने मिश्रण तव्यावर घालून पसरावे.
-वरून झाकण ठेऊन १ मिनिट वाफेवर शिजवावे.
१ मिनिटं नंतर झाकण काढून ३ ते ४ मिनिट तसेच भाजू द्यावे.
-४ मिनिटा नंतर तैसोळी पलटावी.
-दुसरी बाजू देखील २ मिनिट भाजावे. आणि प्लेट मध्ये काढावे.
हि तैसोळी (taisoli) तुपासोबत कींवा सॉस सोबत खायला खूप छान लागते.
तैसोळी रेसिपी चा विडीओ खाली बघा
https://www.youtube.com/watch?v=YoaBbKM27yA